शापीत राजहंस (अनंत तिबीले)
श्रध्देनं प्रेरित झालेला माणूस स्वार्थ तृणावत पायदली तुडवितो;
पण श्रध्देची हिफाजत प्राणाची बाजी लावूनही करतो.
राजे आणि सिहासंन उभी राहतात,
अक्षय टिकतात ती केवल अफाट संख्येच्या स्वार्थी- आपमतलबी बाजारबूणग्यांच्या सैन्यबलावर नाही
तर ती उभी राहतात -टिकतात सिंहासनाबद्दलच्या श्रध्देच्या अधिष्टानावर आणि आपल्या नेत्याबद्दलच्या अपार भक्तिभावावर "
शापित राजहंस (अनंत तिबिले)
नीतिमत्तेचं अधिष्टान नसलेलं सिंहासन दिसायला कितीही मोठं दिसत असलं तरी वाळवीनं पोखरलेल्या वाशागत पोकळ आणि कमकुवत असतं.
बळ आणि अन्याय यांच्या जोरावर हासील केलेली राजसत्ता केवढीही मोठी असली
तरी ती राजयक्ष्मा झालेल्या मानवी शरीरासारखी आतून किडलेली - दुर्बल झालेलीच असते.
अशी सत्ता उलथून पाडायला फरसं बळ वा फारसा अवधीही लागत नसतो "
...... शापित राजहंस (अनंत तिबिले)
तडजोड आपल्या व्यक्तिमत्वाला,प्रतिष्ठेला काहीशी शरमेची असली तरी.
मानवी जीवनाच्या यशात ती अनिवार्य आहे."
शापित राजहंस (अनंत तिबिले)
माणूस ज्या वख्ती गगनाला गवसनी घालण्याच्या कोशिशीत गुंततो
त्या वख्ती पडण्याचं,माघार घेण्याचं वा हताश होण्याचे प्रसंग अनेकदा येतात त्याच्यावर !...
म्हणून काही पडण्याने वा माघार घेण्याने झालेली जखम धरून शोक करीत बसायचे नसतं त्यानं...
उलट आपलं बळच थिटं पडलं अशी समजूत घालून आणि सर्वांगतलं सारं बळ एकवटून सबल मणसासारखी गरूडझेप घ्यायची असते त्यानं;
तेव्हाच तो गगनाला भिडतो...आपलं इप्सित सधतो...!"
...शापीत राजहंस(अनंत तिबीले)
स्त्री सामान्य असली तरी माता या नात्यनं ती कधी दुबळी असूच शकत नाही.!"
...शापीत राजहंस(अनंत तिबीले)
पक्व फळाच्या रसाला अवीट गोडी असते.चंन्द्राची चन्द्रकोर दिसायला सुदंर दिसते,
पण तिच्यातून स्त्रवणारं चांदणं अंधार नाहीसा करु शकत नाही.
अंधार नाहीसा करायला आणि या निसर्गाला सुंदर चंदेरी रूप ध्यायला पौर्णिमेच्या चंद्राचं पूर्ण बिंबच उपयोगी पडतं.
वळ्वाच्या पावसात मेघोदरातून पर्जन्यधारा कोसळतात;
नाही असं नाही.
पण त्यानं निसर्गाची धरित्रीची तृष्णा भागायला तिला हवी असते वर्षाऋतुतील परिपूर्ण अशी संततधार !"
...शापीत राजहंस(अनंत तिबीले)
शब्द रखायचा असतो,ज्याला शब्दाचं मोल कळतं त्याच्यांपाशी.
नीतिनियम पाळायचे असतात, ज्याला नीतिनियमांची चाड आहे त्याच्यापाशी.!"
...शापीत राजहंस(अनंत तिबीले)
गरूडाच्या पिलानं गरूडझेप घेवून अवकाशाचा विस्तार मोजावा,
सिंहाच्या छाव्यानं केवळ पराक्रमच गाजवावा.!"
...शापीत राजहंस(अनंत तिबीले)
पैलतीराजवळ पोहोचलेली नौका नाही तरी काहीशी अस्वस्थच असते. ओलांडून आलेल्या लांबलचक
जीवनमार्गाबद्दल तिला फारशी चिंता वा खंत नसतेच मुळी.काळजी असते ती फक्त उरलेल्या मर्यादित मार्गाची.
हा मार्ग विनासायास पार पडेल की नाही ? या मार्गात काही अडथळे तर येणार नाहीत ना?
आपण किनार्यापर्यंत पोहचू की नाही? एक की दोन अनेक समस्या बनून त्रस्त करु लागतात "
...शापीत राजहंस(अनंत तिबीले)
प्रथम माणसाचं मन मरतं आणि मग माणसाला मरावं लागतं असं लोक म्हणतात. पण आम्ही म्हणतो,
प्रथम माणसातला माणूस मरतो;मन मात्र मरतच नाही. ते आमच्यासारखं दैवगतीनं दुसरीकडे गुंतवावं लागत.

पिलू जोपावेतो मातेपाशी असतं तोपावेतो जसं त्यांच्या पंखातलं बळ कळत नाही,तद्वतच मुलगा विद्वान आहे की नाही हे तो
आपल्या पित्यापासून दूर गेल्याशिवाय कळत नाही.
...शापीत राजहंस(अनंत तिबीले)
आपल्या पित्यापासून दूर गेल्याशिवाय कळत नाही.
...शापीत राजहंस(अनंत तिबीले)
टिप्पणी पोस्ट करा
2 टिप्पण्या
मस्तच.....
उत्तर द्याहटवाआम्हाला ह्या कादंबरीचे pdf पाठवा
उत्तर द्याहटवा