अमृतवेल - वि स खांडेकर

 अमृतवेल - वि स खांडेकर


जग चुकते,त्या चुकीविषयी ऐकते, पण शिकत मात्र नाही !
 प्रत्येक मनुष्य आयुष्याच्या शेवटी शहाणा होतो; पण तो
दुसर्‍याला लागलेल्या ठेचानी नाही, तर स्वतःला झालेल्या जखमांनी!


"मागे किर्र रान पुढे गर्द अरण्य,असे हे जीवन !"

लहानपणाच्या आठवणी किती नाजूक मोहक,
पण किती बहूरंगी असतात !जणू काही मोरपिसच !"

"शब्दापेक्षा स्पर्श अधिक बोलका असतो पण त्याला काही काळजाला हात घालता येत नाही ते काम अश्रूनांच साधते! "

"आईच्या नखात जे बळ असते ते बायकोच्या मुखात...!

जग माणसाच्या मनातल्या दयेवर चालत नाही ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालतं!

जगात सर्व गोष्टी योग्य वेळी माणसाला कळतात झाडाना काही पानाबरोबर फुल आणि फुलाबरोबर फळ येत नाहीत !

जग जिकंण्याइतंक मन जिकणं सोप नाही!

बायकांच लक्ष पुरुष्याच्या जिभेकडे नसंत ते डोळ्याकडे असतं!

या जगात जो तो आपल्याकरिता जगतो हेच खरे वृक्षवेलीची मुळे जशी जवळ्च्या ओलाव्याकडे वळतात , तशी माणसेही सुखासाठी निकटच्या लोकांचा आधार शोधतात;
याला जग कधी प्रेम म्हणते कधी मैत्री म्हणते पण खरोखरच ते आत्मप्रेमच असते !

आकाशाचा अंत एक वेळ लागेल पण माणसाच्या हृद्याचा ?

प्रेम माणसाला स्वतःच्या पलीकडे पाहायची शक्ती देतं ते प्रेम कुणावरही असो ते कशावरही जडलेल असो मात्र ते खंरखुर प्रेम असायला हवं ! ते हृदयाच्या गाभ्यातुन उमलयाला हवं ! ते स्वार्थी, लोभी किंवा फसवं असता कामा नव्हे.
निरहंकारी प्रेम विकासाची पहिली पायरी असते असलं प्रेम केवळ मनुष्य करु शकतो !

प्रिय व्यक्तीला तिच्या दोषासहं स्वीकार करण्याची शक्ती खर्‍या प्रेमाच्या अंगी असते - असली पाहिजे !

कुठला ना कुठला  छदं हे दुःखावरले फार गुणकारी औषध आहे!

भग्न स्वप्नाच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी मनुष्य जन्माला आलेला
नाही ! मानवाचे मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही!
त्याला भविष्याच्या गरुड्पंखांचं वरदानही लाभलेलं आहे.
एखाद स्वप्न पहाणं, ते फुलविणं,ते सत्यसृष्टीत उतरावं म्हणून धडपडणं,
त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्दैवानं ते स्वप्न जरी भंग पावलं तरी
त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसर्‍या स्वप्नामागनं धावणं,
हा मानवी मनाचा धर्म आहे. मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो तो यामुळं!



या चित्रातल्या वेलीवर नाना रंगांची फुलं उमलली आहेत.
प्रीतीही या वेलीसारखीच आहे.प्रीती म्हणजे यौवनाच्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नव्हे!
त्या वासनेची किंमत मी कमी मानत नाही.सा-या संसाराचा आधार आहे ती!
पण या वासनेला जेव्हा खोल भावनेची जोड मिळते,तेव्हाच प्रीती ही अमृतवेल होते.
मग या वेलीवर करुणा उमलते,मैत्री फुलते.मनुष्य जेव्हा जेव्हा आत्मप्रेमाचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरुप होतो,
तेव्हा तेव्हा प्रीतीचा खरा अर्थ त्याला जाणवतो.या बाहेरच्या विश्वात रौद्र-रम्य निसर्ग आहे.सुष्ट दुष्ट माणसं आहेत,
साहित्यापासून संगीतापर्यंच्या कला आहेत आणि महारोग्याच्या सेवेपासून विद्न्यातल्या संशोधनापर्यंची आत्म्याची तीर्थक्षेत्रे आहेत."
"पण हीच प्रीती नुसती आत्मकेंद्रित झाली,
आत्मपूजेशिवाय तिला दूसरं काही सुचेनासं झालं,
म्हणजे मनुष्य केवळ इतरांचा शत्रू होत नाही ,
तो स्वत:चाही वैरी बनतो!मग या वेलीवर विषारी फुलांचे झुबके लटकू लागतात."

माणसानं ओठांशी नेलेला अमृताचा प्याला नियतीला अनेकदा पाहवत नाही.
एखाद्या चेटकिणीसारखे ती अचानक प्रगट होते ,
आणि क्षणार्धात तो प्याला भोवतालच्या धुळीत उडवून देते.

विश्वाच्या या विराट चक्रात तू कोण आणि मी कोण आहोत ?
या चक्राच्या कुठल्या तरी अरुंद पट्टीवर क्षणभर आसरा मिळालेले दोन जीव !
दोन दवाचे थेंब - दोन धुळीचे कण ! स्वत:च्या तंद्रीत अखंड भ्रमण करणारे हे अनादी,
अनंत चक्र,तुझ्या -माझ्या सुख-दु:खांची कशी कदर करु शकेल ?


संकोच हा सत्याचा वैरी आहे.
हिमालयाच्या पायथ्याशी उभा असणारा मनुष्य किती खुजा,किती क्षुद्र दिसेल,याची कल्पना कर.
विश्वशक्तीपुढं आपण सारे तसेच आहोत.जन्म हे या परमशक्तीचं वत्सल स्मित आहे,प्रीती हे तिचं मधुर गीत आहे.मृत्यू ही तिची राग व्यक्त करण्याची रीत आहे.या शक्तीची कृपा आणि कोप यांचा आपण नतमस्तक होऊन स्वीकार केला पाहिजे.

या जगात दु:ख मनुष्याच्या पाचवीला पुजलेलं आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यात ते निरनिराळे रुपं घेऊन येतं!
स्वप्नभंग हा माणसाचा कायमचा सोबती आहे,
पण माणसाचं मोठेपण आपल्या वाट्याला आलेलं सारं दु:ख साहून नवी स्वप्नं पाहण्यात आहे - हालाहल पचवून अमृताचा शोध घेण्यात आहे.
आपण सदैव आत्मकेंद्रित असतो.नेहमी केवळ स्वत:च्याच सुख-दु:खाचा विचार करतो.त्यामुळं आपलं दु:ख आपल्याला फार फार मोठं वाटत राहतं !
तू दु:खाच्या पिंज-यात स्वत:ला बंदिवान करुन घेऊ नकोस.
त्या पिंज-याचं दार उघडं,पंख पसर आणि आकाशात भरारी मार.जीवनाचा अर्थ त्या आकाशाला विचार


कल्पनेची नशा दारुपेक्षाही लवकर चढते.

जर आणि तर ! शब्दांची सुंदर प्रेते ! हे शब्द कोषातून काढून का टाकत नाहीत ?




टिप्पणी पोस्ट करा

8 टिप्पण्या

  1. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा