मानूस - बहिणाबाई चौधरी

बहिणाबाई चौधरी साहित्यविश्व
मानूस मानूस
मतलबी रे मानसा,
तुले फार हाव
तुझी हाकाकेल आशा
.

मानसा मानसा,
तुझी नियत बेकार
तुझ्याहून बरं
गोठ्यांतलं जनावर
.

भरला डाडोर
भूलीसनी जातो सूद
खाईसनी चारा
गायम्हैस देते दूध
.

मतलबासाठीं
मान मानूस डोलये
इमानाच्यासाठीं
कुत्रा शेंपूट हालये
.

मानसा मानसा,
कधीं व्हशीन मानूस
लोभासाठी झाला
मानसाचा रे कानूस !

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. बहिणाबाईंची ही आशयघन व बोधपुर्ण कविता उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आपला खूप खूप ऋणी आहे.
    शाहीर तुळशीराम जाधव, संगमनेर

    उत्तर द्याहटवा