उल्का - वि.स.खांडेकर


उल्का - वि.स.खांडेकर

" हृदयाचे बोल जगाला कर्णकटू वाटतात. सत्य कटू असायचेच. 


सौंदर्य जोपर्यंत ढोंगासोंगाचे पाय चुरण्यात गुंग आहे, तो पर्यंत सत्य कटू राहणारच !"


" लहानपणीच्या  गमती म्हणजे समुद्राच्या वेळेवरले शिंपले. वाटेल तितके वेचावेत.
बाजारात त्यांची कवडीचीही किंमत नाही. पण किती सुंदर दिसतात ते!"

‘‘घरी एकच पणती मिणमिणती
म्हणू नको, उचल, चल लगबग ती! ।।धृ.।।

अगिणत बांधव बघ अंधारी
किर्र रान! भय भवती भारी
चरनि जीवाणू ! भरे शिरशिरी
यमदतूकीटककिरकिरती

काळोखाच्या  भयाण लाटा
उठती फुटती बारा वाटा
फेस पसरला सारा काठा
कुणी म्हणो  तारका लुकलुकती!......

" I Remember, I Remember
The Fir-tree dark and high
Its slender top
Seemed to touch the sky.
But now its little joy
To know that I am far from heaven
Than when I was a boy."    थॉमस हूड

" जिकडे पाहाव  तिकडे मेलेली मन!
या मेलेल्या  मनांना पुरुन टाकलं नाही तर त्यांच्या  घाणीनं सारा समाज सडून जाईल."

" निंदा  ही दारुसारखी असते.
तिचा कैफ चढलेल्या माणसाला गप्प बसवत नाही. "

" आयुष्याच्या प्रत्येक अवस्थेत समवयस्क संवगड्याची ओढणी लागते हेच खरे. एकाच पातळीतल्या दोन प्रवाहांचा अगदी सहज संगम होत नाही का ?"

‘‘अंथरुणाला  खिळण्यात  फार फायदा आहे बरं, भाऊसाहबे,
पांघरुणाखाली माणूसच दिसेनासा होतो. मग त्याचे दोष कुठले दिसणार?’’

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या