तुझी आठवण येते

तुझी आठवण येते जेव्हा
सुर्य अस्ताला जातो 

पक्षी घरट्याकडे वळतात
बाजार संपल्यावर माणसं जशी
घराच्या ओढीने पळतात...

तुझी आठवण येते जेव्हा
हसरी माणसं भेटतात
लाजरी मुलं बोलतात
निशीगंधाची पानं जशी
एक एक करुन हलतात.....

तुझी आठवणं येते जेव्हा
डोळ्यात अश्रु मावतं नाही
झाडे स्तब्ध..हलतं नाही
डोंगराआडचा सु्र्य जेव्हा
वेळ होवुनही कलतं नाही.....

तुझी आठवण येते जेव्हा
कुणीतरी टचकन् बोलतं
अन् बापडं मन जळतं
आपुलकीच्या सावलीसाठी
नुसतं सैरभैर पळतं......

तुझी आठवण येते जेव्हा
डोळ्यात अंधार दाटतो
अन् काही दिसेनासं होतं
नीळ्या आभाळी मन उडून
काही सुचेनासं होतं.........

तुझी आठवण येते जेव्हा
मोरपिस शरीरावरं फिरतं
अलगद तुझ्या श्वासांसारखं
कण अन् कण रोमांचित करुन
एकवार अचानक हरवतं
तुझ्या दूर जाण्याच्या भासांसारखं.....

तुझी आठवण येते जेव्हा
मी तुझ्याजवळुन जपलेला 

क्षण अन् क्शण आठवतो
अन् त्यावेळीच मी
मनातलां पाऊस डोळ्यात साठवतो........

म्हणुनचं मग.......
तुझी आठवण आली की
मी स्तब्ध बसुन राहतो
अन् भुतकाळातलें धागेदोरे
एक एक जुळवून पाहतो.........

-गणेश शिंदे®

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या