उंच उंच माझा झोका - इंदिरा संत

उंच उंच माझा झोका - इंदिरा संत
उंच उंच माझा झोका, झोका बांधला आकाशाला
झोका चढता-उतरता झाला पदर वारा वारा


 
झोक्याला देते वेग पाय टेकून धरणीला
लाल मातीच्या परागाचा रंग चढतो पावलाला
झोका चढतो पूर्वेवर, जाईजुईंनी सावरीला
दंवा-धुक्याचा शुभ्र साज अंगावरती चढविला

झोका चढतो पश्चिमेला, वेल लालन देते तोल
मोकळ्या केसांमधे गुंफी सनया लाललाल

झोका चढतो उंच उंच, पाय पोचती मेघांवरती
इंद्राच्या डोहावरी लाल पाखरें पाण्या येती

झोका चढतो उंच उंच, मला थांबता थांबवेना
गुंजेएवढे माझे घर त्याची ओळख आवडेना

इंदिरा संत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या