कुणाच्या खांद्यावर - आरती प्रभू

कुणाच्या खांद्यावर - आरती प्रभू -shityavishvaकुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे
कशासाठी उतरावे तंबू ठोकून
कोण मेले कोणासाठी रक्त ओकून
जगतात येथे कुणी मनात कुजून

तरी कसे फुलतात गुलाब हे ताजे
दीप सारे जाती येथे विरुन विझून
वृक्ष जाती अंधारात गोठून जळून
जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे


अंत झाला अस्ताआधी, जन्म एक व्याधी
वेदनांची गाणी म्हणजे, पोकळ समाधी
देई कोण हाळी त्याचा, पडे बळी आधी
हारापरी हौतात्म्य हे, ज्याच्या गळी साजे


कवी : आरती प्रभू