समईच्या शुभ्र कळ्या - आरती प्रभू

समईच्या शुभ्र कळ्या - आरती प्रभू -sahityavishva

समईच्या शुभ्र कळ्या, उमलवून लवते;
केसातच फुललेली जाई पायांशी पडते!

भिवयांच्या फडफडी, दिठीच्याही मागे-पुढे;
मागे मागे राहिलेले माझे माहेरे बापुडे!

साचणा-या आसवांना पेंग येते चांदणीची;
आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची!

थोडी फुले माळू नये, डोळा पाणी लावू नये;
पदराच्या किनारीला शिवू शिवू ऊन ग ये!

हसशील, हास मला, मला हसूही सोसेना;
अश्रू झाला आहे खोल, चंद्र होणार का दुणा!

कवी : आरती प्रभू