थोडा गवसु द्या सूर

आंधळ्यांच्या राज्यात
मुक्यांचा कारभार
कायदा झाला बहिरा
अन जनता लाचार!
ज्यानं त्यानं यावं
मनमानी करुन जावं
सामान्यानी मात्र
अत्याचाराचं ओझं वहावं!
राजनेते सगळे भ्रष्ट
जनता फक्त त्रसत
ठेवावी काय नुसती
वरच्यावर भीस्त?
एक एक बळी जाइलं
अन्यायाची सरशी होइलं
सरकार चुप,कायदा शुन्य
अवघा देश,फाशी जाइलं!
विचार करा,फक्त नीट
थोडं होऊन पहा धीट
अत्याचार करणारांच
चक्कित घालुन काढा पीठ!
झोपलेला जागा करा
अन्याय करनारांना दुर
कायदा होऊन शासन करा
थोडा गवसु द्या सूर!!!

गणेश शिंदे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या