आम्ही सारेचं सज्ज्न
आम्ही सारेचं सज्ज्न
एका बेवारस म्हातारीचं प्रेत
भरचौकातल्या रस्त्यात पडलयं
आम्ही जवळ जातो...बघतो..हळहळतो
अरेरे...कुणाला तरी कळायलां हवं
अन् दिर्घ सुस्कारा टाकून निघुन येतो..
शेजारच्या घरी एक दारुडा नवरा
निष्पाप बायकोला रोज मारतोय...
आम्ही 'रोजचीच कटकट साल्यांची'
म्हणुन टिव्ही चा व्होल्युम वाढवतोय.
आज अमक्याच्या अंत्ययात्रेला जायचंय...
'का ग,हा ड्रेस सिच्युऎशनला स्युट होईल का?
'का ग,आज थोडा लाइटचं सेंट मारु का?
मेलेल्याला आमचा ड्रेस दिसेल का?
आमचा सेंट,लाइट की स्ट्रोंग कळेल का?
अडचणीत सापडलेला एक,खरोखर
कळवळुन सांगतोय त्याची कर्मकहानी
आमची बोटे,मोबाइलच्या कि-पैड वर
कानात इयरफोनवर एफएम ची गाणी
ओेषधे हवीत,शेजारच्या व्रृध्द आजोबांना
ह्याला बोलावतात..त्याला बोलावतात
सगळ्यांना सांगुन बिचारे खरचं दमतात
आपल्याकडं येवुन,आपबिती सांगतात
आम्ही..'काय माणसं आहे साली गधी,
बुजू्रगांची कामे ऎकत नाही साधी साधी'
गाडीला किक् मारतो अन् म्हणतो...
'ऒफिसचा टाइम झाला..बरं आजोबा येतो.....
रस्त्यावर अचानक एक कार झर्रदिशी..
ऊडतो सायकलस्वार..भळाभळा रक्त सांडतयं...
अन् शरीर...शेवटच्या श्वासांच गणित मांडतय....
आम्ही एसी कारची काच खाली करतो
टॊमीसह मान बाहेर काढतो..अन् म्हणतो
''रोजचाच ड्रामा..कुणीतरी मरतो अन् ट्रैफिकजैम होतो''
'पॊप्स,व्हाट इज मिन बाय,अॅजी अॅन अॅज्योबा?''
आमचा काॅन्व्हेंटी मुलगा निरागसतेने विचारतो..
आम्ही त्याला घेतो..संथ पावलांनी बाल्कनीत येतो..
झाडाखाली एक व्रृद्ध जोडपं..भीक मागतांना......
सी..दॅट ऒल्ड मॅन अॅन्ड वुमन आर आजी-आजोबा!
अन् वेळ सहज मारुन नेतो.......!
कारण,आमच्या घरातले 'ओल्ड मॅन अॅन्ड वुमन'
केव्हाच गेलेले असतात 'शेल्टर-होम' मधे
'कुणा'च्या तरी परोपकारी सल्ल्याने..
कुणाच्या अधे ना मधे..
.............................. ......................
अशा खुपशा गोष्टी आम्ही मनावरं घेत नाही
कुणाचं टेंशन घेत नाही,अन् कुणाला टेंशन देत नाही...
कारण आमचं मन दहा एमएम काचेचं आहे ,
अन् हृद्य सुद्धा हिऱ्याच आहे......
महाकठीण असं.....
जिथुन शब्दही येत नाही,अन् पाझरही फुटतं नाही..
आपुलकीही असतं नाही,अन् भावनाही निसटतं नाही......
कारण...आम्ही सारेच सज्जन आहोत!!
---------------------------
-गणेश शिंदे
भरचौकातल्या रस्त्यात पडलयं
आम्ही जवळ जातो...बघतो..हळहळतो
अरेरे...कुणाला तरी कळायलां हवं
अन् दिर्घ सुस्कारा टाकून निघुन येतो..
शेजारच्या घरी एक दारुडा नवरा
निष्पाप बायकोला रोज मारतोय...
आम्ही 'रोजचीच कटकट साल्यांची'
म्हणुन टिव्ही चा व्होल्युम वाढवतोय.
आज अमक्याच्या अंत्ययात्रेला जायचंय...
'का ग,हा ड्रेस सिच्युऎशनला स्युट होईल का?
'का ग,आज थोडा लाइटचं सेंट मारु का?
मेलेल्याला आमचा ड्रेस दिसेल का?
आमचा सेंट,लाइट की स्ट्रोंग कळेल का?
अडचणीत सापडलेला एक,खरोखर
कळवळुन सांगतोय त्याची कर्मकहानी
आमची बोटे,मोबाइलच्या कि-पैड वर
कानात इयरफोनवर एफएम ची गाणी
ओेषधे हवीत,शेजारच्या व्रृध्द आजोबांना
ह्याला बोलावतात..त्याला बोलावतात
सगळ्यांना सांगुन बिचारे खरचं दमतात
आपल्याकडं येवुन,आपबिती सांगतात
आम्ही..'काय माणसं आहे साली गधी,
बुजू्रगांची कामे ऎकत नाही साधी साधी'
गाडीला किक् मारतो अन् म्हणतो...
'ऒफिसचा टाइम झाला..बरं आजोबा येतो.....
रस्त्यावर अचानक एक कार झर्रदिशी..
ऊडतो सायकलस्वार..भळाभळा रक्त सांडतयं...
अन् शरीर...शेवटच्या श्वासांच गणित मांडतय....
आम्ही एसी कारची काच खाली करतो
टॊमीसह मान बाहेर काढतो..अन् म्हणतो
''रोजचाच ड्रामा..कुणीतरी मरतो अन् ट्रैफिकजैम होतो''
'पॊप्स,व्हाट इज मिन बाय,अॅजी अॅन अॅज्योबा?''
आमचा काॅन्व्हेंटी मुलगा निरागसतेने विचारतो..
आम्ही त्याला घेतो..संथ पावलांनी बाल्कनीत येतो..
झाडाखाली एक व्रृद्ध जोडपं..भीक मागतांना......
सी..दॅट ऒल्ड मॅन अॅन्ड वुमन आर आजी-आजोबा!
अन् वेळ सहज मारुन नेतो.......!
कारण,आमच्या घरातले 'ओल्ड मॅन अॅन्ड वुमन'
केव्हाच गेलेले असतात 'शेल्टर-होम' मधे
'कुणा'च्या तरी परोपकारी सल्ल्याने..
कुणाच्या अधे ना मधे..
..............................
अशा खुपशा गोष्टी आम्ही मनावरं घेत नाही
कुणाचं टेंशन घेत नाही,अन् कुणाला टेंशन देत नाही...
कारण आमचं मन दहा एमएम काचेचं आहे ,
अन् हृद्य सुद्धा हिऱ्याच आहे......
महाकठीण असं.....
जिथुन शब्दही येत नाही,अन् पाझरही फुटतं नाही..
आपुलकीही असतं नाही,अन् भावनाही निसटतं नाही......
कारण...आम्ही सारेच सज्जन आहोत!!
---------------------------
-गणेश शिंदे

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या