पाकळ्या चुरगाळीतांना

पाकळ्या चुरगाळीतांना,मीही तसाच चुरगळून गेलो.
या जगा छळावे म्हणुनी,
मी ही बराच छळून गेलो.
अंतरीच्या वेदनांना..गाव द्यावे एक अनामिक म्हणून मी,
साऱ्या  जगभर एक गाव शोधित गेलो.मी न म्हटले भावनांना,
येवु नका ओठी ना नयनी..
भावना सांभाळतांना मीच मजला संपवित गेलो.
आंधळ्या कोशिंबीरीचा,बहुत झाला खेळ आता..
खेळतांना खेळ फक्त मी उरलेली वेळ मोजीत गेलो....
                                                            गणेश शिंदे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या