थोडं थांब

थोडं थांब... अजुनकुठे सायंकाळ कलते आहे..
अन् धपापत्या ऊरात कुठे कुठे सलते आहे....
थोडं थांब...बघुनचं जा ना प्राक्तनाचे भोग...
मग म्हणू नको,'तू फार वेगळं बोलते आहे...
------
थोडं थांब...बघ गिधाडांचे थवे दिसताहेत...
भिरभिरत्या अधाशी नजरांनी,बघ कसे हसताहेत...
थोडं थांब...बघुनचं जा..बोलु नकोसचं काही...
कदाचित तुझ्या प्रतिसादानेच ते रुसताहेत..
-----
थोडं थांब...बघ कसा एक-एक लचका तोडतीलं...
विखारी दातांनी मग आडवं ऊभं फाडतीलं...
थोडं थांब...फुकटात नुसता तमाशा तर बघ...
मी रडतं नाहीचं,तुझे डोळे मात्र ऊगाच रडतील...
-----
थोडं थांब...पण जखमेवर फुंकर मारु नकोस....
अन् विनाकारन आशेची पहाट करु नकोस...
थोडं थांब...पण पाहिलेलं उगाच आठवु नकोस...
तुझ्या सुखात,माझं दुखः साठवु नकोस...
------
थोडं थांब...जीव जायला अजुन अवकाश आहे...
माझं मरणं खरचं सावकाश आहे.....
मेल्यावरचं सुटतील सगळे पाश आहे....
थोडं थांब...माझ्या पार्थिवावरं खरंच कुणी रडणांर नाही...
पण....पण....तुझ्यावर मात्र माझा विश्वास आहे..........!!

 

                                                            गणेश शिंदे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या