कवी - ग्रेस
निष्पर्ण तरुंची राई
शब्दांनी हरवुनी जावे , क्षितिजांची मिट्ता ओळ,
मी सांज फुलांची वेळ, व्रुक्षांच्या कलत्या छाया
मी सांज फुलांची वेळ, व्रुक्षांच्या कलत्या छाया
पाण्यावर चन्द्र फुलांची, मी निळीसावळी वेल.
गात्रांचे शिल्प निराळे, स्पर्शाचा तुट्ला गजरा,
मी गतजन्मीची भुल, तु बावरलेला वारा,
पायात धुळिचे लोळ, मी भातुकलिचा खेळ
त्या वेली नाजुक भोळ्या वाऱ्याला हसवुन पळती
क्षितिजांचे तोरण घेउन दारावर आली भरती ॥२॥ देऊळ पलिकडे तरिही तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळांपाशी मी उरलासुरला थेंब ॥४॥
संध्येतिल कमळासम मी नटलो शृंगाराने
देहाच्याभवती रिंगण घालती निळाइत पाने ॥५॥
ते धुके अवेळी होते की परतायाची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या निष्पर्ण तरुंची राई ॥७॥

- चंद्रमाधवीचे प्रदेश, ग्रेस
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या