ओठ - सुरेश भट

ओठ
तू नभातले तारे माळ्लेस का तेव्हा?
माझियाच स्वप्नांना गाळलेस का तेव्हा?
आज का तुला माझे एवढे रडू आले ?
तू चितेवरी अश्रू ढाळलेस का तेव्हा?
हे तुझे मला आता वाचणे सुरु झाले...
एक पानही माझे चाळ्लेस का तेव्हा?
बोलली मिठी माझी -'दे प्रकाश थोडासा!
तू मला तशा रात्री जाळ्लेस का तेव्हा?
कालच्या वसंताला ठेवतेस का नावे;
वायदे फुलायचे पाळलेस का तेव्हा?
चुंबिलास तू माझा शब्दशब्द एकांती;
ओठ नेमके माझे टाळलेस का तेव्हा?

                       सुरेश भट

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या