दु:ख........ अमृतवेल - वि स खांडेकर

या जगात दु:ख मनुष्याच्या पाचवीला पुजलेलं आहे.प्रत्येकाच्या आयुष्यात ते निरनिराळे रुपं घेऊन येतं!स्वप्नभंग हा माणसाचा कायमचा सोबती आहे,पण माणसाचं मोठेपण आपल्या वाट्याला आलेलं सारं दु:ख साहून नवी स्वप्नं पाहण्यात आहे - हालाहल पचवून अमृताचा शोध घेण्यात आहे.
आपण सदैव आत्मकेंद्रित असतो.नेहमी केवळ स्वत:च्याच सुख-दु:खाचा विचार करतो.त्यामुळं आपलं दु:ख आपल्याला फार फार मोठं वाटत राहतं !
तू दु:खाच्या पिंज-यात स्वत:ला बंदिवान करुन घेऊ नकोस.त्या पिंज-याचं दार उघडं,पंख पसर आणि आकाशात भरारी मार.जीवनाचा अर्थ त्या आकाशाला विचार


                                                                                    अमृतवेल - वि स खांडेकर


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या