चंदेरी स्वप्ने - वि.स.खांडेकर (Chanderi Swapne by V.S.Khandekar )

चंदेरी स्वप्ने - वि.स.खांडेकर ( Chanderi Swapne by V.S.Khandekar )
चंदेरी स्वप्ने - वि.स.खांडेकर

" जो अंतर्मुख होऊन आपल्या अनुभूतीकडे पाहू लागतो,जो कणाकणाने आणि अत्यंत प्रामाणिकपणाने जीवनाचे ज्ञान गोळा करतो, त्यालाच कलावंत म्हणवून घेण्याचा अधिकार प्राप्त होतो."

" मानवी अंत:करण ही  अनंत आकाशापेक्षाही विशाल आणि अदभूतरम्य अशी चीज आहे. "

" जगण्यांत  सुख नाही, पण मारण्यांत  तरी ते कुठे आहे ?"

" घराला लागलेली  आग त्यांचे दारें बंद करून थोडीच विझते !"

 " दोन नद्यांच्या  प्रवाहाची दिशा  एकच असल्यावर  त्याचा संगम होण्याला कितीसा विलंब लागणार ?

" प्रवासात मन कसे वावडीसारखे वाऱ्यावर फिरत असते. मधेच ते गतकाळात भटकू लागते, मधेच भविष्याकडे झुकते."

" रीमंताची मने असतात फार नाजूक ! एखाद्या लवंगी शब्दाने सुद्धा त्यांना उष्णता होते."

" दुसऱ्याच्या डोक्यावर नसेल इतका माणसाचा स्वत:च्या  डोळ्यावर विश्वास बसतो."

 आकाश हा आभास आहे ! नाही का ? जमीन खरीखुरी असते. साऱ्या जीवांना आधार देणारी.


" मधुर स्वप्न म्हणजे उत्कृष्ट काव्याच ! दोन्हीतही अनुभव आणि आशा याचा किती सुंदर संगम होत असतो !"

" कला हे स्वप्न, प्रेम हेही स्वप्न आणि जीवन हे ही स्वप्नच नाही का ? पण-पण सारीच स्वप्ने कुठे चांगली असतात ?"

" काटे फिरवून घड्याळाची वेळ घडयाळ बरोबर करता येतात; पण माणसांची  मनं काही बदलता येत नाहीत  तशी  !"
 
" कुठलही प्रेम हे जगातल मोठं वेड असतं !"

" पुस्तकी शिक्षणानं कुणी मनुष्य होत नाही ; प्रेमाने होतो."

" साप, व्यभिचार व लढाई यांच्या गोष्टींना कधी अंत नसतो.मानवजात अजून रानटी आहे . . . . . तुम्ही आम्ही सारे अजून रानटी आहोत ! म्हणूनच असल्या लढाया होतात !"

" कडुलिंबाचं झाड फार जुनं झालं म्हणजे त्याच्या लाकडाला चंदनाचा वास येतो, असं म्हणतात.
जिला आपण सुधारणा सुधारणा म्हणतो, तो असलाच सुवास आहे !"

" बुद्धीवर जगणायाचं आयुष्य हे बाभळीच्या झाडासारखं आहे. जवळ येणायाला त्याला सावली तर देता येतच नाही, उलट, त्याचे काटे मात्र केव्हा पायांत मोडतील, याचा नेम नसतो !"

" प्रत्येक माणसाला तत्त्वज्ञानाचं सुंदर चित्र आवडतं !
पण त्याची लांबीरुंदी स्वार्थाच्या चौकटीइतकीच असावी, अशी त्याची अपेक्षा असते !"



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या