पुन्हा एकवार

पुन्हा एकवार.....
मेंदीभरले हात हातात आले
अर्धोन्मिलीत नयनांचे देणेघेणे झाले
निळ्या आभाळाला फिरुन एकवार
धरतीचे अनामिक देने मिळाले
  

पुन्हा एकवार....
पैंजणांचा नाद स्थिरावला
श्वासभरला देह थरथरला
अधोरेखित स्वप्नात पुन्हा
हवाहवासा गुलाबी रंग भरला
 

पुन्हा एकवार.....
आयुष्यातला चंन्द्र सजला
अंगातला विरहाचा दाह विझला
मोकळ्या आभाळातला पाऊसही
स्वतच्या थेंबात  पुन्हा भिजला
 

पुन्हा एकवार.....
'तू' अलगद आयुष्यात आली
हिरवी गाणी पुन्हा फुलली
तुझी साथ झाली..म्हणुनचं
रातरानी पुन्हा बहरली
 

पुन्हा एकवार.....
मी माझा राहिलो नाही
हरलो नाही..हरवलो नाही
तू सोबत आहे,म्हणुनचं
चालत राहीलो,थांबलो  नाही. 

                                         गणेश शिन्दे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या