हा आमचा देश

हा आमचा देश जिथं लाखो लोक उपाशी पोटी टाचा घासतात, मोहाची फुलं खाऊन गुंगीच्या कैफात भुकेचा अग्नी शमवण्याचा प्रयत्न करतात ,
तिथच सहस्त्र साधू,शिक्षित ब्राम्हण,समाजधुरीण जमीनदार जर या देशातील गरिबांच्या रक्ताचं शोषण करीत असतील ; तर त्या मुठभरांच्या प्रगतीची आणि त्यांच्या ज्ञानाची व्यर्थ प्रशंसा मी कशाला करीत बसू ? गरिबाची कणव न घेणारा हा देश आहे, की नरक ? श्रमिकांना हक्क
नाकारणारा हा धर्म आहे की सैतानाचं तांडव ? देश म्हणून आम्ही आमची प्रतिमाच गमावून बसलो आहोत ! य मातीतील बहुजनाच्या जागृती साठी साद घाला उठवा सामान्य जनांना ! ध्या आकार पुन्हा आपल्या प्रियतम मातृभूमीला .
***
                                                                           महानायक – विश्वास पाटील

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या